कॉमेडि किंग आणि अभिनेता कपिल शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. एकीकडे तो त्याच्या प्रोफेशन लाईफशी निगडित व्हिडियो फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतो तर दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्सही देत असतो. अशा परिस्थितीत काल रात्री कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन्सला फटकारले असून त्यांच्या सेवेत येणाऱ्या अडचणींबाबत तीन ट्विट केले आहेत. कपिलने त्याच्या एक्स अकाउंट वर दोन व्हिडिओही शेअर केले आहेत.
कॉमेडियन कपिल शर्माच्या फ्लाइटला बुधवारी रात्री उशीर झाला, त्यानंतर तो इंडिगो एअरलाइन्सवर नाराज होताना दिसला. त्याने सोशल मीडियावर सांगितले की तो जवळपास तासभर इतर प्रवाशांसोबत ट्रान्झिट बसमध्ये अडकला होता आणि त्याला फ्लाइटबाबत कोणतीही अपडेट देण्यात आली नाही. कपिलने सांगितले की, पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे त्याला फक्त सांगण्यात आले होते.
त्याच्यावर पोस्ट करत आहे खरंच? आम्ही 8 वाजता टेक ऑफ करणार होतो आणि 9:20 वाजले आहेत, अजूनही कॉकपिटमध्ये पायलट नाही, तुम्हाला असे वाटते का की हे 180 प्रवासी पुन्हा इंडिगोमध्ये उड्डाण करतील? कधीही #Indigo 6E 5149 #Shameless
People r suffering bcoz of you @IndiGo6E lying lying n lying, there r some old passengers on wheel chairs, not in a very good health condition. Shame on you #indigo 👎 pic.twitter.com/87OZGcUlPU
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2023
यानंतर कपिलने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये प्रवाशांना विमानातून बाहेर उतरवलं जात आहे. ‘आता ते विमानातून प्रवाशांना बाहेर काढत आहेत आणि दुसऱ्या एअरक्राफ्टमध्ये पाठवणार असल्याचं सांगत आहेत. पण आता आम्हाला पुन्हा एकदा टर्मिनलवर सेक्युरिटी चेकसाठी जावं लागणार. लोकांना तुमच्यामुळे त्रास सहन करावा लागतोय आणि इंडिगो आमच्याशी फक्त आणि फक्त खोटंच सांगतेय. प्रवाशांमध्ये काही वयोवृद्ध आणि काही व्हिलचेअरवर आहेत, ज्यांची प्रकृती ठीक नाही. खरंच तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, अशी तक्रार कपिलने केली. कपिलने ‘एक्स’वर (ट्विटर) इंडिगो एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनाही टॅग केलं आहे. चेन्नई ते मुंबई प्रवासादरम्यान हा त्रास सहन करावा लागल्याचं त्याने नमूद केलं.
एखाद्या एअरलाइनकडून प्रवाशांची अशा प्रकारे गैरसोय झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही बऱ्याच सेलिब्रिटींना अशा पद्धतीना अनुभव आला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे एअरलाइनची तक्रार केली. कपिल शर्माच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत एअरलाइनवर संताप व्यक्त केला आहे.