जगप्रसिध्द जॉनी-एम्बर मानहानीच्या खटल्यात जॉनी डेप विजयी, निकालाचे जगभरातून स्वागत

हॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता जॉनी डेप आणि त्याची आधीची पत्नी एम्बर हर्ड यांचा खटला जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. या खटल्याचा निकाल आता जाहीर झालाय. जॉन डेपवर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पायरेट्स ऑफ कॅरेबियन चित्रपटाचा अभिनेता जॉनी डेप याची आधीची पत्नी एम्बर हर्ड हीने डेपवर गंभीर आरोप केले होते. “डेप मला दारू पिऊन मारहाण करायचा, त्याने माझा शारिरीक छळ करुन धमकावलं” असे गंभीर आरोप खुलेपणाने केले होते. यानंतर डेपने या विरोधात तक्रार दाखल करत मानहानीचा दावा केला होता.

या खटल्यात एम्बरकडून अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले होते. यात आपले उद्योगपती एलॉन मस्क याच्यासोबत आपले संबध होते, असा देखील दावा तिने केला होता. यामुळे हे प्रकरण संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला होता.

Please follow and like us: