टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 6 ऑगस्ट 2021 – अमेरिकेची औषध कंपनी जॉनसन अँड जॉनसनने भारत सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लसीच्या मंजुरीचा प्रस्ताव ठेवला आहे. या लसीचा एक डोस प्रभावशाली आहे, असा कंपनीचा दावा आहे. या लसीला सरकारने मंजुरी दिल्यास भारतामध्ये कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी चौथी लस उपलब्ध होणार आहे.
देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस दिले जाताहेत. आतापर्यंत या लसींच्या माध्यमातून ४९.५३ कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. जर जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी मिळाली, तर सिंगल डोस असलेली पहिली लस ठरणार आहे.
जॉनसन अँड जॉनसन लसला मंजुरी मिळाल्यास देशातील लसीकरण मोहिमेला वेग येणार असून कमी वेळात अधिक प्रमाणात लसीकरण होणार आहे. कोरोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस ८५ टक्के प्रभावी आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच दक्षिण आफ्रिका व ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील आहे, असा दावा कंपनीने केला आहे.