TOD Marathi

JEE Main पेपर 2 चा निकाल जाहिर

संबंधित बातम्या

No Post Found

JEE मुख्य 2022 पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency NTA) हा निकाल जाहीर केला असून उमेदवार आता त्यांचा JEE Mains परीक्षेचा निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. हा निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना आता JoSAA काऊंसलिंगमध्ये (JoSAA Counselling) सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या काऊंसलिंगनंतर निवडले जाणारे उमेदवार देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. त्याच वेळी, एजन्सीनं (JoSAA) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (IIT) देशातील इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी काऊंसलिंग वेळापत्रक जारी केलं आहे. वेळापत्रकानुसार, JoSAA काऊंसलिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

कसा तपासायचा निकाल?
• 1. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
• 2. होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.
• 3. नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती सबमिट करा.
• 4. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निकाल उपलब्ध होईल.
• 5. निकाल तपासा.
• 6. आवश्यक असल्यास तुम्ही निकालाची प्रिंटही काढू शकता.
दरम्यान, 11 जुलै 2022 रोजी जेईई मेन 2022 सत्र 1 चा निकाल जारी करण्यात आला होता. 14 विद्यार्थ्यांना सत्र 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले होते. ही परीक्षा 23 जून 2022 ते 29 जून 2022 दरम्यान भारत आणि परदेशातील 500 हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली. NTA नुसार, दोन्ही सत्र परीक्षांसाठी 1026799 विद्यार्थ्यांनी JEE मेन 2022 साठी नोंदणी केली होती, तर 905590 विद्यार्थी दोन्ही सत्र परीक्षेला बसले होते.