टिओडी मराठी, श्रीनगर, दि. 14 ऑगस्ट 2021 – सध्या देश 2021 च्या स्वातंत्र्यदिनाच्या तयारीत व्यस्त आहे. याच दरम्यान, जम्मू -काश्मीरच्या पोलिसांनी एका दहशतवादी कट उधळून लावला आहे. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी स्वातंत्र्यदिन वेळी हल्ला करण्याचा विचार करत होते. पोलिसांनी एक दिवसापूर्वीच जैशच्या मॉड्यूलचा पर्दाफाश करून 4 दहशतवाद्यांना अटक केलीय.
जम्मू -काश्मीर पोलिसांनी पकडलेले हे दहशतवादी मोटारसायकल आयईडी वापरून स्वातंत्र्यदिनी हल्ला करणार होते, अशी त्यांची योजना होती. तथापि, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा हेतू अपयशी ठरवला.
पोलिसांनी या दहशतवाद्यांना तसेच त्यांच्या साथीदारांना अटक केलीय. हे लोक ड्रोनमधून सोडलेली शस्त्रे जैशच्या सक्रिय दहशतवाद्यांकडे पोहोचवून हल्ल्यामध्ये मदत करत होते.
यानंतर, 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते मोटरसायकलमध्ये आयईडी टाकून हल्ला करणार होते, यासाठी तो राज्याव्यतिरिक्त अनेक शहरांत रेकी करत होता.
The arrested JeM terrorists were planning to plant a vehicle-based IED in Jammu before August 15 & reconnaissance of important targets in other parts of the country: IGP, Jammu
— ANI (@ANI) August 14, 2021
जम्मू-काश्मीरसह देशातील सर्व प्रमुख शहरांत स्वातंत्र्य दिन लक्षात घेता सुरक्षेबाबत पोलीस कडक आहेत. त्याचबरोबर जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दले सातत्याने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवत असून त्यांचे कट उधळून लावत आहेत. दहशतवाद्यांकडून अधिक प्रमाणात शस्त्रेही जप्त केली जात आहेत.
Averting a major tragedy in Jammu, police have busted a module of Jaish-e-Mohammed & arrested four terrorists who were planning the collection of arms dropped by drones & supply to active terrorists in Kashmir valley: : Inspector General of Police, Jammu
— ANI (@ANI) August 14, 2021