मुंबई :भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) सर्च इंजिनमधील प्रसिद्ध नाव असलेली कंपनी गुगलला (Google Search Engine) मोठा दणका दिलाय. गुगलकडून आयोगने तब्बल 1 हजार 337 कोटी रुपयांचं दंड ठोठावलाय. बाजारात असलेल्या आपल्या स्थानाचा चुकीचा वापर गुगलने केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. अँड्रॉइड मोबाईल डिव्हाइस (Android Mobile Device) इकोसिस्टमच्या क्षेत्रात गुगलने आपल्या ताकदवर स्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय सीसीआय अर्थात भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुगला आपली गैरवर्तवणूक सुधारावी, अशा इशाराही दिलाय. मर्यादित वेळेत गुगलने आपली चूक सुधारावी, असे निर्देश गुगलला आयोगाकडून देण्यात आलेत.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुरुवारी याबाबती माहिती दिली. नॉन ओएस वेब स्पेसिफिक वेब ब्राऊजर मार्केटमध्ये आपलं दबदबा वाढवण्यासाठी गुगलने ऍप स्टोर मार्केटमध्ये आपल्या सद्यस्थितीचा गैरवापर केल्याचं आयोगाने म्हटलंय. त्याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
आता गुगलला एक मर्यादित वेळ आखून देण्यात आली आहे. या वेळेत त्यांनी आपण केलेली चूक सुधारावी, असा आयोगाने म्हटलं आहे. शिवाय 1 हजार 337.76 कोटी रुपयांचा आर्थिक दंडही गुगलकडून आकारला जाईल, असंही स्पष्ट केलं आहे.
याआधीही गुगलच्या विरोधात चौकशी आदेश काढण्यात आलेत होते. याच महिन्यात गुगलविरोधात चौकशी आदेश देण्यात आले होते. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी आपल्या आदेशात चौकशी अहवाल देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. हा अहवाल पोलीस महासंचालकांना देण्यात येणार आहे.
गुगलच्या विरोधात न्यूज ब्रॉडकास्टर्स एन्ड डिजिटल असोसिएशनने एक तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन गुगलबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सर्च इंजिनवर एका विशिष्ट संस्थेच्या वेबलिंकला प्राथमिकता देण्यासाठी गुगल इतर संस्थांची माहिती देण्यासाठीही भाग पाडत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.
गेल्या काही काळापासून गुगलवर सातत्यानं सवाल उपस्थित केले जात आहेत. भारताशिवाय युरोप, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही गुगलवर गंभीर आरोप करण्यात आलेत. गुगल शॉपिंगला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप युरोपात केला जातोय. तसंच काही ठराविक जणांना प्राधान्य देणं आणि ऑनलाईन जाहिरातींमध्ये स्पर्धा संपवण्याचाही आरोपही गुगलवर करण्यात आला आहे. अमेरिकेत गुगल पे सर्विस आणि काही विशिष्ट सर्च रिझल्ट देण्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यावरुन गुगलवर कित्येक अरब डॉलरचा दंड वसून करण्यात आला होता.