दिल्ली : इराणहून चीनला (Iran to China) जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्तानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एअरफोर्सच्या लढाऊ विमानांनी (Air Force Fighter Jets) विमानावर लक्ष ठेवण्यासाठी तात्काळ उड्डाण भरले आहे. महान एअरलाइन्सचे (Mahan Airlines) हे विमान दिल्लीच्या (Delhi) हवाई हद्दीत घुसले होते. सुरक्षा एजन्सींना (Security Agencies) मिळालेल्या माहितीनुसार विमानात बॉम्ब असल्याची बातमी आली होती, त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि विमानाला दिल्लीत उतरण्याची परवानगी रद्द करण्यात आली .
हे विमान चीनला (China) जाणार होते. विमान भारतीय हवाई हद्दीत असताना इंडियन एअर ट्रॅफिक कंट्रोलने (Indian Air Traffic Control) विमानासोबत अलर्ट शेअर केला होता. यानंतर भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI लढाऊ विमानांनी विमानाला रोखण्यासाठी पंजाब आणि जोधपूर (Punjab and Jodhpur) एअरबेसवरून उड्डाण केले. बॉम्बची धमकी खरी आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही.
एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानहून येणारे हे विमान चीनमधील ग्वांगझू येथे उतरणार होते. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर महान एअरने तत्काळ दिल्ली विमानतळ एटीसीशी संपर्क साधला, परंतु दिल्ली एटीसीने विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास सांगितले. पण विमानाच्या पायलटने नकार देत भारतीय हवाई हद्द सोडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना सकाळी ९.२० वाजता महान एअरलाइन्समध्ये (Mahan Airlines) बॉम्बची बातमी मिळाली. यानंतर एकच खळबळ उडाली. जेव्हा पायलटने विमान जयपूरकडे वळवण्यास नकार दिला तेव्हा भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी निगराणीसाठी उड्डाण केले आणि इराणी विमानाला एस्कॉर्ट केले. Filghtradar24 च्या माहितीनुसार, इराणचे विमान काही काळ दिल्ली-जयपूर हवाई हद्दीत कमी उंचीवर होते आणि त्यानंतर ते भारतीय हवाई हद्दीबाहेर गेले नाही.