नवी-दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या COP-26 या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी(२ नोव्हें.) बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.
मोदी यांच्या अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी भाषण केले. त्यांनी विकसनशील देशांना स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी मदत करण्याची ग्वाही दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी परिषदेते उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पृथ्वीची सध्याची स्थिति जेम्स बॉन्ड चित्रपटासारखी असल्याचे म्हणले.
यावेळी बोलत असतांना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, ब्रिटनच्या हरित हमीमुळे भारतातील स्वच्छ ऊर्जा, वाहतूक आणि नागरी विकास क्षेत्रात स्वच्छ पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असे सांगण्यात आले.