पुणे शहरातील महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात लावलेले फलक अनधिकृत असल्याचे माहिती अधिकारात ॲड विशाल सातव यांनी निदर्शनास आणून केले. (Adv. Vishal Satav Pune)
अनेक शासकीय कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, अजामीन पात्र गुन्हा, ३ वर्षांचा कारावास व दंड अशा प्रकारचा IPC ची कलमे दर्शविलेला फलक दर्शनी भागात लावलेला असतो, तो वाचल्यानंतर कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला सामान्य नागरिकाला भिती वाटते. या बाबत ॲड. विशाल सातव यांनी पुणे महानगर पालिकेकडून (PMC Pune) हे फलक लावण्यासंदर्भात शासनाचे काही आदेश किंवा परिपत्रक आहेत का ? अशी माहिती मागवली. तरी या संदर्भात शासनाचे कुठलेही आदेश नसल्याचे समोर आले आहे.
“असे धमकीवजा फलक कुठल्याही शासकीय कार्यालयात दिसले तर नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा ! तसेच शासनाने सुद्धा असे फलक स्वतःहून काढून टाकावेत. आपण आपल्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक रहा तथा सतर्क रहा”. अशी प्रतिक्रीया अॅड. विशाल सातव यांनी दिली आहे.