TOD Marathi

पुण्यात भीषण अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यु

संबंधित बातम्या

No Post Found

पुणे: पुण्यातील सासवड रोडवर (Saswad Road Pune) एक भीषण अपघात झाला असून यात वडील आणि मुलगी या दोघाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Accident in Pune, Father and Daughter Died) मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ट्रकची धडक लागून हा अपघात घडला असून, अपघातानंतर वडिलांचा जागीच मृत्यू झाला. मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी येथे झाला.

नीलेश साळुंखे, मीनाक्षी साळुंखे अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकीची नावे आहेत. (Nilesh Salunkhe, Minakshi Salunkhe) मीनाक्षी ही साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. साळुंखे कुटुंब पुण्यातील भेकराई नगर मध्ये वास्तव्यात आहे.