विना डिग्री कोणीही Doctor बनत असेल तर ‘त्यांच्यावर’ कारवाई करा; नवाब मलिक यांचा बाबा रामदेव यांच्यावर हल्ला

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जून 2021 -ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री नाही, ते लोक उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. जर कोणी विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

बाबा रामदेव यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तर ते प्रचार आणि लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र, आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असेही मलिक म्हणाले.

केंद्रीय आरोग्य विभागाने बाबा रामदेव यांचे विधान गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता दिली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनविले आहेत. वैज्ञानिक पद्धतीने जी थेरपी असून तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनविली आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

यासह बाबा रामदेव डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करताहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत. रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात. त्यापेक्षा दुर्दैवी घटना होऊ शकत नाही, अशा शब्दांत मलिक यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Please follow and like us: