Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
मराठी चित्रपटाचा शो रद्द झाल्यानंतर हेमंत ढोमे यांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले..

TOD Marathi

असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. अशेच घरापासून लांब गेलेल्या सर्वांची गोष्ट घेऊन सनि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला (Lalit Prabhakar) म्हणजेच ‘सनी’ला (Sunny) क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. ‘होमसिक’ बनलेल्या ‘सनी’चा एक भावनिक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Marathi actor and director Hemant Dhome) सध्या त्याच्या ‘सनी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा हेमंत अनेकदा त्याच्या चित्रपटांसंबंधी अपडेट चाहत्यांशी शेअर करत असतो. याशिवाय तो अनेकदा मराठी चित्रपटांच्या सत्य परिस्थितीकडेही सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. मराठी चित्रपट आणि बॉक्स ऑफिसबद्दल हेमंत ढोमेनं केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.
मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हेमंत ढोमेने (Hemant Dhome) खरमरीत ट्वीट केलं आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “आपल्या अजून एका प्रेक्षकाबरोबरही तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 कल्याणमधला हा प्रकार… प्रेक्षक जात असूनही चित्रपट असा डावलला जाणं चूक की बरोबर?” तसेच आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्याने, “दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?” असंही म्हटलं आहे.

हेमंत ढोमेच्या (Hemant Dhome) या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. आपल्या कमेंट्समधून युजर्सनी हेमंतच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही केवळ हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन देत मराठी चित्रपटसृष्टीवर अन्याय केला जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अर्थात या आधीही एक प्रेक्षकाबरोबर असा प्रकार घडला होता आणि त्याकडेही हेमंत ढोमेने लक्ष वेधलं होतं.

हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला ‘सनी’ हा मराठी चित्रपट सध्या बराच गाजतोय. घरापासून दूर असलेल्या एका तरुणाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.दरम्यान हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मुख्य भूमिकेत आहे. त्याच बरोबर चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख (Chinmoy Mandalakar, Ksiti Jog, Abhishek Deshmukh) यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज