TOD Marathi

“बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टला आज वर्ष… ते माझ्या आयुष्यातला तमाशा Live”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

हेमांगी कवीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी लवकरच ‘तमाशा Live’ या चित्रपटात दिसणार आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिची मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून तिच्या आयुष्यातला ‘तमाशा Live’ सांगितला आहे.
हेमांगीने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने चित्रपटातील तिचं पोस्टर शेअर केलं आहे. आणि हे पोस्टर शेअर करत
“माझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’. माझ्या खूप व्हायरल झालेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला आज वर्ष पूर्ण होतंय आणि मला त्याचा अभिमान आहे. काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देतायेत. टॅग करतात, ते खिल्ली उडवणारच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणार ही नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही, पण अनेक लोक या ट्रोलर्सला एवढेच किंबहुना जास्तच म्हणेन मी खूप समजूतदार, संवेदनशील लोकांनी मला पाठिंबा दिला आणि माझ्याशी जोडले गेले”,
असे हेमांगी कॅप्शन हेमांगीनं दिलं आहे.

पाहा हेमांगीची पोस्ट

पुढे हेमांगी म्हणते, “खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता. काही तरी वादग्रस्त, खळबळजनक बोलून मला कुठलाही पब्लिसिटी स्टंट वगैरे करायचा नव्हता. मला माझ्या देशाने व्यक्त व्हायचा अधिकारी दिलाय आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. तसाच व्यक्त व्हायचा अधिकार काही ट्रोलर्सने घेतला आणि वाट्टेल ते थराला जाऊन ट्रोल केलं. अजूनही करतात. ते बरोबर की चूक, योग्य की अयोग्य मला माहीत नाही. बस समाज आणि माणूस म्हणून आपण कोण आहोत याची ओळख झाली.”
पुढे त्या पोस्टविषयी आणखी सांगताना हेमांगी म्हणाली, “मित्र परिवाराने साथ सोडली, काहींनी unfollow केलं, काहींनी लांब राहणं योग्य समजलं. अनेक हितचिंतकांचे फोन आले. काही पाठिंबा देणारे तर काही भीती दाखवणारे. ‘आता तुझं करिअर धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी इमेज आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं करिअर हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही!”
पुढे हेमांगी म्हणाली, “मी त्यांच्या या बोलण्यामुळे घाबरले नाही पण वाईट नक्कीच वाटलं होतं. मनात आलं खरंच असं घडलं तर आपण दुसरा मार्ग धरू. दुसरं काहीतरी चांगलं काम करू, पण तसं काही करायची वेळ आली नाही कारण जुलै महिन्याच्या शेवटी संजय दादांचा ‘तमाशा Live’ साठी फोन आला आणि दीड दोन महिन्यांचं वर्क शॉपकरून सिनेमा शूट सुद्धा केला आणि आता तो प्रदर्शित होतोय!”
दिग्दर्शक संजय जाधव विषयी बोलताना हेमांगी म्हणाली, “दादा, या सगळ्या घटनेनंतर ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात! लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन! हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप प्रेम आणि आभार. मागच्या वर्षी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ मुळे मी ब्रेकिंग न्यूजच्या भोवऱ्यात आले होते आज ‘तमाशा Live’ मुळे बातम्यांच्या वलयात आहे. माझ्या पोस्टची anniversary मी अशा पद्धतीने साजरी करेन असं वाटलं नव्हतं! आज चित्रपट प्रदर्शित होतोय खरा पण माझ्या आयुष्यात माझा ‘तमाशा Live’ मागच्या वर्षी याच दिवशी सुरू झाला होता!”

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज