TOD Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ( sai tamhankar ) कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असते.

 

सईने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

 

सई मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलीवूडमध्ये ( bollywood ) आता सक्रिय झाली आहे.

सईची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते.

नुकतंच सईने तिच्या इन्स्टाग्राम ( instagram ) अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे.

फोटोतील तिने घातलेल्या ड्रेसमुळे सद्या तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.


सईने हा लेटेस्ट पेहराव एका खास कारणासाठी केला आहे. ते कारण म्हणजे ‘एले ब्युटी अवॉर्ड्स 2022’ ( Elle Beauty Awards 2022 ). मात्र या ड्रेसमुळे सई ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.


‘दिवाळीचा कंदील, हा ड्रेस आहे का मंडपच्या झालरी आहेत, तेच म्हटलं लग्नाच्या मंडपत्ला पर्दा गेला कुठ’, कपडे घातले की पडदा गुंडाळला अशा अनेक कमेंट तिच्या लेटेस्ट फोटोंवर येत आहेत.

सई कायमच अशा ट्रोलर्सला दुर्लक्षित करत आलेली आहे. ती नकारात्मक कमेंटकडे कायमच दुर्लक्ष करते.