TOD Marathi

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. (Heavy rainfall in last few days) विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीचा मार्ग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगलाच पाऊस झाला. (Might be heavy rainfall in coming 4-5 days) शुक्रवारी देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणेसह विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता हाच पाऊस पुन्हा चार- पाच दिवस राहणार असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत असे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढच्या 48 तासात मुंबईसह इतर महत्त्वाच्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

८ ऑक्टोबर रोजी मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यभर ढगाळ वातावरण राहील आणि 11-12 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे.

गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाने शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे चित्र महाराष्ट्रभर पाहायला मिळालं. त्यातच पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आहे.