TOD Marathi

दिल्ली:
“ज्ञानवापी’ प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर ‘ज्ञानवापी’ बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आजूबाजूच्या परिसरातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहेत. कुठलाही अनुचित प्रकार याठिकाणी घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूची सुरक्षा वाढवण्यात आलेली असून दुकानही बंद करण्यात आलेली आहेत.

आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट कुठला निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. ज्ञानवापीतील सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचीकेवर ही सुनावणी होत आहे.