मुंबई : मन उडू उडू झालं म्हणत महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने दिग्दर्शक निर्माता प्रतिक शाह सोबत ह्रता 18 मे रोजी लग्नगाठ बांधली ह्रताने गपचूप केलेल्या लग्नाने तिच्या चाहत्यांना मोठं सप्राइज मिळालं. ह्रता आणि प्रतिक यांच्या लग्नाला मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती. या नवविवाहीत दाम्पत्याला सिनेसृष्टी तसेच सर्व चाहत्यांकडून शुभाशिर्वाद मिळत आहेत. लग्नाचे सर्व विधी आटोपून अखेर ह्रता आणि प्रतिक हनिमूनला निघाले आहेत. ह्रताने स्वत: इस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
ह्रताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला पती प्रतिक शाह सोबतचा सेल्फी फोटो शेअर केला आहे. “लेस्ट गो प्रतिक शाह” असे म्हणत प्रतिकला स्टोरी टॅग देखील केली आहे. दोघांचा हा फोटो मुंबई विमानतळावरील असल्याचं फोटोच्या बॅकग्राऊंडवरुन लक्षात येत आहे. दोघांच्या हातात सामान देखील दिसत आहे. या फोटोवरुन दोघे हनिमूनला निघाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. पण दोघे हनिमूनला नक्की कुठे चाललेत हे काही त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे चाहते त्यांचं लाडकं कपल हनिमूनसाठी कुठे निघालेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.