Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
हार्दिक जोशीनं हातानं विणली अक्षयासाठी लग्नाची साडी....

TOD Marathi

हार्दिक जोशीनं हातानं विणली अक्षयासाठी लग्नाची साडी….

संबंधित बातम्या

No Post Found

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात राणादा आणि पाठक बाईंनी लोकप्रियता मिळवली. या मालिकेमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लवकरच खऱ्या आयुष्यातही जोडीदार होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनी घरातील जवळच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

ऑनस्क्रीन अक्षया आणि हार्दिक (Hardik & Akshaya) यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता हे दोघंजण लवकरच खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी होत आहेत. अक्षय आणि हार्दिक दोघांकडेही लगीन घाई सुरू झाली आहे.दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. हार्दिक-अक्षयाचे लग्नाआधी केले जाणारे केळवणही पार पडले आहे.

अक्षया आणि हार्दिक यांच्या जवळची मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या सगळ्यांनी मिळून अक्षया जी साडी लग्नावेळी नेसणार आहे ती विणण्याचा शुभारंभ पुण्यात पार पडला. साडी विणण्याचा हा विधी प्री-वेडिंगमधील भाग झाला आहे. याआधीही काही कलाकार दाम्पत्यांनी त्यांच्या लग्नाच्या आधी हा विधी केला होता.

अक्षयाने लग्नातील ती नेसणार असलेल्या साडीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या साडीतील एक एक धागा जवळच्या असलेल्या खास व्यक्तींच्या हातून विणला जात आहे. हार्दिकसह अभिनेत्री वीणा जगताप, रुचा आपटे (Veena Jagtap, Rucha Apte) यांनीही अक्षयाच्या लग्नातील साडीचा एक धागा विणला. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत पोस्टला छान कॅप्शनही दिलं आहे. “विणकाम सोहळा. ही पोस्ट शेअर करायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पण त्या दिवसाइतकीच ही पोस्टही मला परफेक्ट करायची होती. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्ही लग्नात नेसणार असलेल्या साडीतील एक धागा विणत आहेत, हे किती छान आहे. या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

अक्षयाने सगळ्यांचे आभारही मानले आहेत. “या विणकाम सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. एवढी छान कल्पना आम्हाला दिल्याबद्दल सौदामिनी हॅण्डलूमचे धन्यवाद. यामुळे माझ्या लग्नाची साडी आणखीनच खास बनली आहे”, असंही पुढे तिने म्हटलं आहे.
अक्षया आणि हार्दिक यांचा ३ मे रोजी साखरपुडा झाला. त्यावेळी जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते.आता ते लवकरच विवाहबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. अक्षया आणि हार्दिक यांनी लग्नाची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही आहे पण चाहते अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज