TOD Marathi

गांधीनगर :

राहुल गांधींची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. दरम्यान, गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. (Gujrat Assembly Election 2022) विविध राजकीय पक्षानी स्वतःला प्रचारात झोकून दिलं आहे. याच दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांवर तसेच आणखी दोन बड्या नेत्यांवर या निवडणुकीमध्ये विशेष जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नेते गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेससाठी महत्वाची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहेत. (Maharashtra Congress leaders Ashok Chavan, Prithviraj Chavan got responsibilities)

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक (Prithviraj Chavan and Mukul Wasnik are appointed as supervisors) यांना पक्षाने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक यांच्यासह मोहन प्रकाश, बी के हरिप्रसाद आणि के एच मुनियप्पा या वरिष्ठ नेत्यांकडेही पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वासनिक यांना गुजरातच्या दक्षिण क्षेत्राचे तर चव्हाण यांना मध्य क्षेत्राचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे गुजरातमध्ये काँग्रेससाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. (Ashok Chavan and Shivajirao Moghe are in the list of star campaigners) मंगळवारी दुपारी याबाबतची घोषणा करण्यात आली. स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह सोनिया गांंधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा अशा एकूण ४० नावांचा समावेश आहे. याच ४० जणांमध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश आहे.

गुजरातमधील विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकींचे निकाल लागणार आहेत.