TOD Marathi

पुण्यात RTE अंतर्गत शाळेत Admission देण्यासाठी लाच घेणाऱ्या गट शिक्षणअधिकाऱ्याला अटक

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 सप्टेंबर 2021 – पुण्यात RTE अंतर्गत शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणाऱ्या एका गट शिक्षण अधिकाऱ्याला अटक केली आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली होती. यात या शिक्षण अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

रामदास वालझडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. RTE अर्थात राईट टू एजुकेशन (Right To Education) मार्फत शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच मागितली होती.

तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करून सापळा रचत 50 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक केली. याअगोदर देखील पुण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली होती.