मुंबई : पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नसेल. आता मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडर वरून ऑनलाईन कोणतंही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या शासन आदेशानुसार आता शासकीय विभागीय रत्नागिरी येथील ग्रंथालय हे आधुनिक आणि डिजिटल होणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी शासकीय ग्रंथालय आधुनिक डिजिटल करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शासकीय विभागीय ग्रंथालयांमध्ये उपलब्ध ग्रंथ साहित्य पुस्तके हे मोबाईल ॲप मधून देखील वाचकांना वाचता येणार आहे. हे सर्व करण्यासाठी या शासन निर्णयानुसार शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान ग्रंथालयात येऊन जर वाचकांना पुस्तके वाचायचे असतील तर त्यासाठीची सोयही करण्यात आली आहे. यामध्ये 10.1 इंची ई-बुक रीडर अँड्रॉइड टॅब अशी 20 टॅब ग्रंथालयांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध असतील.