TOD Marathi

मुंबई : मागील वर्षाच्या  तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यामध्ये टॅंकरची संख्या कमी  आहे, सर्व गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही, असं आवाहन  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

हसन मुश्रीफ यावेळेस बोलताना म्हणाले की,संपूर्ण जगाचे तुलना करता भारतात उष्णतेची लाट अधिक मोठी आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार जल जीवन मिशन नाही रागवत आहे. पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं त्याच ठिकाणी पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

तसेच धरणातही पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे यावर्षी राज्यात टँकरची संख्याही कमी आहे. येत्या दोन वर्षात पण यावेळेस पाण्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुश्रीफ यांनी यावेळेस दिला.