टिओडी मराठी, दि. 2 ऑगस्ट 2021 – अँड्रॉइड आवृत्ती 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी गुगल आपला सपोर्ट थांबविणार आहे. याबाबत गुगलने वापरकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जुना अँड्रॉइड स्मार्टफोन आहे का? हे तपासा.
हि प्रक्रिया 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार आहे, त्यानंतर असे वापरकर्ते त्यांच्या फोनमध्ये गुगल ड्राइव्ह, गुगल खाते, जी- मेल आणि यु ट्यूब चालणार नाही किंवा त्यांना या सेवांचा वापर करता येणार नाही.
वापरकर्त्यांच्या फोनमध्ये आता अँड्रॉइडची किमान 3.0 हनीकॉम्ब आवृत्ती असायला हवी, जरी जुनी आवृत्ती असलेले वापरकर्ते ब्राउझरद्वारे त्यांच्या जीमेल खात्यात प्रवेश करू शकतील, असाही गुगलने दिलासा दिलाय.
9 ते 5 गुगलने वापरकर्त्यांना पाठवलेल्या ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अँड्रॉइड आवृत्ती 2.3.7 व त्यापेक्षा कमी असलेल्या वापरकर्त्यांना जी-मेलमध्ये लॉगिन करताना वापरकर्ताचे नाव किंवा संकेतशब्द त्रुटीचा संदेश मिळत आहे.
या मेलमध्ये, वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे आणि त्यांचे फोन अपग्रेड करण्यास सांगितले आहे. २ सप्टेंबर 2021 नंतर, अँड्रॉइडची अशी आवृत्ती असलेल्या सर्व वापरकर्त्यांना जीमेल, यूट्यूब, गुगल मॅप, यूट्यूब इत्यादी गुगलच्या या ऍप्समध्ये लॉग इन करताना त्रुटी आढळतील.
या व्यतिरिक्त, जर एखादा वापरकर्ता त्या फोनमध्ये नवीन गुगल खाते तयार करेल किंवा नवीन खात्यासह लॉग इन करेल किंवा फॅक्टरी रीसेट करेल, तरीही प्रत्येक वेळेस त्याला त्रुटी आढळेल. या व्यतिरिक्त, जुन्या आवृत्ती असलेल्या वापरकर्त्यांना गुगल खात्याचा पासवर्ड बदलतानाही त्रुटी मिळेल, त्यामुळे आताच अपडेट करून घ्या.