TOD Marathi

पुण्यातील ‘या’ स्टेडियमला देणार Golden Boy Neeraj Chopra चे नाव !

टिओडी मराठी, पुणे, दि. 21 ऑगस्ट 2021 – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथेलेटिक्स- भाला फेक स्पर्धेत पाहिले सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मान पुण्यातील दक्षिण कमांड सुभेदार नीरज चोप्राने मिळवून दिला आणि इतिहास रचला आहे. त्यामुळे पुण्यातील स्टेडियमचे नामकरण गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या नावावर केले जाणार आहे, असे समजते.

नीरज चोप्रा काही वर्षापासून पुण्यामध्ये प्रशिक्षण घेत होता. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये कठोर परिश्रम करत मोठे यश संपादन केलं आहे. त्याच्या यशाचे गैरव म्हणून आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला त्याचे नाव देणार आहे, यासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार असून येत्या सोमवारी अर्थात 23 ऑगस्ट रोजी राजनाथसिंह पुणे दौऱ्यावर आहेत.

दक्षिणी कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी ८७.५८ मीटर लांब भाला फेकून ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. तो मूळचा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यामधील खांद्रा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे.

पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये ऑलम्पिक खेळासाठी लागणाऱ्या अनेक सुविधा आहेत. यामध्ये लष्करातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी या संस्थेतून खेळाडू प्रशिक्षण घेतात. येथील प्रशिक्षणाच्या जोरावर अनेक खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत भारतीय लष्करातील देशाची मान उंचावलीय.