श्रावणात सोन्याची घसरण सुरुच, जाणून घ्या नवे दर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली होती. नंतर सातत्याने सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आणि म्हणूनच श्रावणाच्या महिन्यात सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. (Gold Silver Price Update On Nagpanchami)
आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,150 रुपये आहे तर 24 कॅरेट साठी 51,440 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुढीलप्रमाणे:
चेन्नई – 52390 रुपये
दिल्ली – 51,600 रुपये
हैदराबाद – 51,440 रुपये
कोलकत्ता – 51,380 रुपये
लखनऊ – 51,600 रुपये
मुंबई – 51,440 रुपये
नागपूर – 51,470 रुपये
पूणे – 51,470 रुपये
श्रावण महिना सुरू होण्याच्या पूर्वीपर्यंत सोने-चांदीच्या दरात घट झाली नव्हती. मात्र श्रावण सुरू झाल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली होती. नागरिकांनी देखील सोने खरेदीसाठी यादरम्यान आवड दर्शवली आहे. यानिमित्ताने मोठ्या कालावधीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.