TOD Marathi

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोर्टाने संजय राऊत यांची ईडी कोठडी (ED Custody) आणखी चार दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे आता राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

ईडीने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही लोकांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. त्यासाठी संजय राऊत कोठडीत असणे गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ईडीची ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आता पुढील तपासात आणखी कोणत्या नव्या गोष्टी समोर येणार, हेही पाहावे लागेल.

कोठडीत आवश्यक व्हेंटिलेशन नसल्याने श्वसनाचा त्रास होतो, अशी तक्रार संजय राऊत यांनी PMLA कोर्टात ईडी विरोधात केली होती. तर जिथे ठेवले जाते तिथे फक्त पंखा आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत. यावर राऊत राहत असलेल्या रूममध्ये एसी आहे असं उत्तर ईडीच्या वतीने देण्यात आलं होतं.