TOD Marathi

देशात Gold Hallmarking अनिवार्य; जाणून घ्या, तुमच्या घरातील Gold चं काय होणार?

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जून 2021 – देशात आता गोल्ड हॉलमार्किंगचा अनिवार्य असणार आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी, यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचे केलं आहे. या नियमाचा आराखडा दीड वर्षांपूर्वीच तयार केला आहे. मात्र, कोरोनामुळे तो लागू केला नव्हता. आता उद्यापासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आता आपण याबाबत पडणारे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर जाणून घेऊया.

गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय?
गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरविली जाते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागणार आहेत. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळणार आहे.

कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग?
सोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे विविध प्रकार पडत असतात. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग आवश्यक आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. त्याचं उत्तर १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट असे आहे.

जाणून घ्या, किती दंडाची तरतूद?
नियमाचे उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा २०१६ च्या २९ कलमाखाली कारवाई केली जाईल. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १ वर्षाचा कारावास व १ लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे.

फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची?
दुकानदाराने तुमची फसवणूक केल्यास ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी बीआयएसच्या मोबाईल ऍप किंवा तक्रार नोंदणी पोर्टल याचा वापर करू शकता.

आता घरात असलेल्या सोन्याचं काय?
ग्राहकांना घाबरण्याची आवश्यकता नाही. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असणार आहे. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज