टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 मे 2021 – कोरोना आजारातून बरे झालेल्यांना म्युकोरमायकोसिस हा एक नवीन आजार होत आहे. या आजारावर महाराष्ट्र सरकारकडून मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तसेच या आजाराचा महात्मा फुले जन-आरोग्य योजनेत समावेश केला आहे. राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. ठाकरे सरकारचा हा निर्णय गरीब रूग्णांसाठी दिलासादायक आहे.
सध्या सूरतमध्ये दोन दिवसांपूर्वी म्युकोरमायकोसिसचे 40 रूग्ण आढळून आले. त्यांच्यापैकी 8 रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले. हा आजारने ग्रस्त असे काही रूग्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हि आढळले आहेत.
सोमवारी चंद्रपुरमधून म्युकोरमायकोसिसचा संसर्ग 10 रूग्णांना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे 30 पेक्षा अधिक म्युकोरमायकोसिसने पीडित रूग्णांवर मुंबईच्या केईएम व ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या आजाराचा समावेश आता महात्मा फुले जन-आरोग्य योजनेत झाल्याने आता रूग्णांना यातून आर्थिक मदत मिळेल. तसेच या आजाराचा उपचार मोफत होऊ शकतो. म्युकोरमायकोसिसचा उपचार महाग असतो, ज्याचा खर्च उचलणे सामान्य रुग्णांना अवघड जाते.