टिओडी मराठी, मेलबर्न, दि. 4 मे 2021 – भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात मोठे संकट उभारले आहे. म्हणून भारताला मदतीसाठी अनेक देश पुढे येत आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हि मदतीचा हात दिलाय.
करोनाविरोधातील लढ्याला बळकटी देण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन व यूनिसेफच्या सहकार्यातून भारतासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी प्रारंभिक रूपात 50 हजार डॉलरची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया बोर्डाने ट्विट करत दिलीय.
तसेच भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियातील नागरिकांनाही मदतीचे आवाहन केलं आहे.
याबाबत ऑस्ट्रेलिया बोर्डाचे सीईओ निक हॉकले म्हणाले, करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आमच्याकडून शक्य होईल तितकी मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तसेच भारतातील नागरिकांच्या दुःखात सहभागी आहे.