TOD Marathi

Yeddyurappa यांच्या मूळ गावात बंद पाळून BJP नेतृत्वावर नाराजी व्यक्त ; तर कर्नाटकात नव्या CM चा शोध सुरू

टिओडी मराठी, बेंगळुरू, दि. 26 जुलै 2021 – कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा देतेवेळी आपण समाधानी आहे, असे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केलीय. येडियुरप्पा यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी बंद पाळला आहे.

शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर हे येडियुरप्पांचे मूळगाव आहे. तेथे आज ग्रामस्थांनी दुकाने, संस्था, कार्यालये बंद ठेवून भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र आले. चर्चा केली आणि त्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला. काहींनी गावातल्या मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढून येडीयुरप्पा यांना पाठिंबा असल्याचं सांगितले.

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री राजीनामा देण्यापूर्वी ही अशाप्रकारे त्यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं होते. येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. त्या समाजाच्या 30 मठाधिपतींनी त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी आपले समर्थन दिल होतं. परंतु त्याचा परिणाम झाला नाही. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला.

नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू :
आता त्यांच्या जागी कर्नाटकमध्ये नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू झाला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग हे केंद्रीय निरीक्षक म्हणून कर्नाटकात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. हे विधिमंडळ नेते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

परंतु, त्याआधी मावळते मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या समर्थकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शक्तिप्रदर्शन केले आहे. येडियुरप्पा यांच्या मूळ गावातला बंद हा त्याचाच एक भाग मानला जातोय.