टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जून 2021 – रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोना काळात रेल्वे प्रशासनाने अनेक मार्गांवरील रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. आता यातील काही रेल्वेगाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात मनमाडसह नाशिक जिह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशासह महाराष्ट्र राज्यात सुद्धा करोनाची दुसरी लाट कमी झाली आहे. त्यामुळे ब्रेक द चैन अंतर्गत लावलेले निर्बंध काहीसे शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय.
मनमाड आणि नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस होणार सुरू करणार आहे.
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस 26 जून (शनिवार) पासून सुरु करणार आहे. तर मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही 25 (शुक्रवार) तारखेपासून सुरू करणार आहे.