TOD Marathi

सातारा: कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार आहे. कोणी जाणार जरी म्हटलं तरी कोरोना जाणार नाही, असे वक्तव्य उदयनराजे यांनी काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे, मात्र उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं. यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट देवून मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू मंदावत आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेले दोन दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.