TOD Marathi

‘इथल्या’ HP च्या रिफायनरीमध्ये स्फोट!; ‘अग्निशमन’कडून आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम इथल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडच्या रिफायनरीला मंगळवारी आग लागली. या नंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

एपीसीएलच्या जुन्या टर्मिनलच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये ही आग लागली. यानंतर लगेच कर्मचारी व कामगार युनिटच्या बाहेर आले. स्फोट होऊन ही आग लागली, अशी माहिती कामगारांनी दिली.

त्यानंतर तिथे असलेल्या अग्निशमन यंत्रणेद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागलेत. मात्र, आग मोठ्या स्वरुपात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

एचपीसीएलच्या विसाख रिफायनरीच्या एका क्रूड प्रोसेसिंग युनिटमध्ये आग लागली. अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने ही आग तातडीने विझवली आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच इतर रिफायनरीसुद्धा सुरक्षित आहे, असे एचपीसीएलतर्फे सांगण्यात आले.

गेल्या वर्षीसुद्धा लागली होती आग :
मागील वर्षी 21 मे रोजी एचपीसीएलच्या रिफायनरीमध्ये आग लागली होती. तांत्रिक कारणांमुळे आगीची घटना घडली होती. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर, क्रूड डिस्टिलेशन युनिट प्लांट पुन्हा सुरू केला होता.