टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 मे 2021 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहर पाहता सुप्रीम कोर्टाने एक राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन केलीय. या टास्क फोर्सद्वारे संपूर्ण देशात मेडिकल ऑक्सिजनची गरज, उपलब्धता व वितरण याच्या आधारावर मुल्यांकनाचे काम केलं जाईल.
या टास्क फोर्सची स्थापना करताना सुप्रीम कोर्टाने असे म्हटलं आहे की, राष्ट्रीय स्तरावर या टास्क फोर्सच्या स्थापनेचा उद्देश कोरोना साथीदरम्यान नागरिकांच्या आरोग्याची शास्त्रीय व एका विशिष्ट पद्धतीने काळजी घेणं हाच आहे.
या टास्क फोर्समुळे सध्याच्या स्थितीत समोर असलेल्या समस्यांवर तोडगा काढणारे व निर्णय घेणारे यांना महत्त्वाची मदत मिळू शकणार आहे. टास्क फोर्स सध्या आणि भविष्यात पारदर्शकपणे व व्यावसायिकरित्या महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरणासह त्यासाठी माहिती प्रदान करेल, असेही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
यापूर्वी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केंद्राला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला कोविड-19 च्या रुग्णांच्या उपचारासाठी दररोज 700 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सीजन पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यातील तुटवड्याच्या दिल्ली सरकारच्या विनंतीवर विचार केलाय.
दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आदेश देण्यात येईल. असेही कोर्टाने म्हटलं होतं. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात अवमानप्रकरणी सुरू केलेली कारवाई स्थगित केली होती.
अशी आहे, राष्ट्रीय टास्क फोर्सचे 12 सदस्य :
1. डॉ. भबतोष विश्वास (माजी कुलपती, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता)
2. डॉ. देवेंद्र सिंह राणा (अध्यक्ष, व्यवस्थापकीय मंडळ, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली)
3. डॉ. देवी प्रसाद शेट्टी (अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बेंगळुरू)
4. डॉ. गगनदीप कांग (प्राध्यापक, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिळनाडू)
5. डॉ. जेवी पीटर (संचालक, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिळनाडू)
6. डॉ. नरेश त्रेहान (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मेदांता हॉस्पिटल आणि हृदय संस्था, गुरुग्राम)
7. डॉ. राहुल पंडित (संचालक, क्रिटिकल केअर मेडिसीन आणि आईसीयू, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, महाराष्ट्र)
8. डॉ. सौमित्र रावत (अध्यक्ष आणि सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि यकृत प्रत्यारोपण विभाग प्रमुख, सर गंगा राम हॉस्पिटल)
9. डॉ. शिव कुमार सरीन (वरिष्ठ प्राध्यापक, हेपेटोलॉजी विभागाचे संचालक, (ILBS),दिल्ली)
10. डॉ. जरीर एफ उदवाडिया ( कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि पारसी हॉस्पिटल, मुंबई)
11. सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण कल्याण मंत्रालय, भारत सरकार
12. नॅशनल टास्क फोर्सचे संयोजक, जो सदस्य असेल ते केंद्रात कॅबिनेट सचिन असतील