बारामतीत कुनाला उडू देत नाही असं गंमतीने बोल्लं जातं, पन ते आज खरं ठरलं बारामतीत घडलेल्या एका घटनेनी. आज तांत्रिक बिघाडामुळे इंडियन एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लँडिंग केलं गेलं. बारामती तालुक्यातील खांडजमध्ये सकाळी साडे दहा वाजण्याचा सुमारास चेतक ZA 425 या हॅलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले आहे. इमरजन्सी लँडिंग झाल्यानंतर कोणालाही कसलीही ईजा झाली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये इंडियन एअर फोर्सच्या एक महिला तर तीन एअर फोर्सचे जवान होते. खांडज गावाच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये इंडियन एअर फोर्सच्या चेतक विमानाचं लँडिंग करण्यात आलं. पुण्याहून हेलिकॉप्टर सोलापूरकडे जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रीक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने प्रसंगावधान ओळखून हेलिकॉप्टर सुरूक्षितरित्या लँड केलं. नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार हे वायुदलाचे हेलिकॉप्टर असुन खांडज गावातील हेलिकॉप्टर उतरल्यानंतर माळेगाव पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त पुरवला गेला. वायुदलाचे अधिकरीही त्या ठिकाणी पोहोचले. या दरम्यान एअर फोर्सचे आणखी एक हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले होते. मदत पुरवून ते हेलिकॉप्टर परतले.