टिओडी मराठी, ठाणे, दि. 27 जुलै 2021 – आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध शहराचे दौरे सुरू केले आहेत. पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरे यांनी ठाणे शहराकडे लक्ष दिलं आहे. ठाण्यातील सीकएपी हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आणि काही बाबतीत पदाधिकाऱ्यांचे कानही टोचले. सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि कामाला लागा, असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, असेही सांगितलं.
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना म्हटले, सोशल मीडियाचा वापर कमी करावा . निवडणुकीच्या तयारीला लागावे. ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक विद्यमान आहेत, तेवढ्याच वार्ड शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे.
आणखी एकमेकांशी हेवेदावे करू नका, एकमेकांशी जोडून राहा. जे नवीन येतील. पक्षबांधणी नव्याने करावी आणि एकमेकांशी वाद करू नये. मनसे पक्ष कसा बळकट होईल? यासाठी त्याचा विचार करा. त्याच्यासाठी कष्ट करा, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
प्रभाग अध्यक्ष पद रद्द करणार असून प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देणार आहे. पुण्यामध्ये जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यामध्ये निवडणार आहे. 25 दिवसांनी ठाण्याही पर्याय निवडणार आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटलंय.
रायगड दुर्घटनेमध्ये नुसते दौरै करणे योग्य नाही, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. वादळी वाऱ्याबाबत राज्यामध्ये काहीच नियोजन नाही. ठाणे शहराची दुरावस्ता झाली आहे.
मी लहान असताना ठाणे शहर कसे होते? आणि आता कसे आहे?. ठाण्यात टाऊन प्लॅनिंग नाही. त्यांच्यामुळे अशा परिस्थिती आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.