शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray birthday) यांचा केला आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena chief) हा उल्लेख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटमध्ये टाळलेला आहे.
एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये लिहितात,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
गेले काही दिवस महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचं (Maharashtra Politics) राजकारण पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून ट्विट करून एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करण्यात आलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने दोन्ही बाजूनी टीका होत राहिली. मात्र, आज उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांमध्ये केवळ माजी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय.