TOD Marathi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन मातोश्रीवर रात्री एकच्या सुमारास करण्यात आलं. (Uddhav Thackeray birthday) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस एरवी होत असलेल्या वाढदिवसांपेक्षा वेगळा आहे. मात्र, यंदाही उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा एकच्या सुमारास एक मोठा केक आणण्यात आला होता. शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना “तुम जियो हजारो साल, हॅपी बर्थडे उद्धव साहेब” अशा गाण्याच्या ओळी देखील शिवसैनिकांनी गात वाढदिवस जल्लोषात साजरा केला. (Shiv sainik celebrated birthday of Uddhav Thackeray)

या वाढदिवसाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray with Uddhav Thackeray) देखील यामध्ये दिसत आहेत. मातोश्रीवर (Matoshri) उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सजावट करण्यात आलेली आहे. प्रवेशद्वारावर फुलांनी सजवलेली धनुष्यबाणाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर जमलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार का? आणि साधला तर त्यांना ते काय सांगतील, हे बघावं लागेल.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray birthday) यांचा केला आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena chief) हा उल्लेख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटमध्ये टाळलेला आहे.