TOD Marathi

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. (Rahul Gandhi Congress) मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणुगोपाल, मणिकम टागोर, इम्रान प्रतापगढ़ी आणि के सुरेश यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे होते. या नेत्यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले.

ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींनी ट्विट करत मोदी सरकारवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. आम्हाला अटक झाली तरी तुम्ही आम्हाला गप्प करू शकणार नाही, असेही ते म्हणाले. सत्य ही हुकूमशाही संपवेल. तत्पूर्वी, दिल्लीतील विजय चौकात अटकेपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे सर्व खासदार येथे आले आहेत. त्यांनी महागाई आणि बेरोजगारी यावर भाष्य केले. पोलीस आम्हाला इथे बसू देत नाहीत. संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही आणि इथे ते आम्हाला अटक करत आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi ED Inquiry) यांनी ईडीच्या 28 प्रश्नांची उत्तरे दिली होती, ‘नॅशनल हेराल्ड’ (National Herald) वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांची दोन तास चौकशी केली होती. याच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभर आंदोलन केले.

यापूर्वी, ईडीने सोमवारी सोनियांना समन्स बजावले होते, परंतु नंतर ही तारीख एक दिवसाने वाढवण्यात आली. 21 जुलै रोजी सोनियांची दोन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली होती, जिथे त्यांनी एजन्सीच्या 28 प्रश्नांची उत्तरे दिली होती. ईडी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड मधील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करत आहे, ज्याची मालकी नॅशनल हेराल्ड या काँग्रेसने प्रमोट केलेल्या वृत्तपत्राकडे आहे.