TOD Marathi

अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) स्टारर ‘दृश्यम 2’ (Drishyam 2)ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. ‘दृश्यम’च्या यशानंतर अजय देवगणने (Ajay Devgn) त्याच्या चाहत्यांसाठी ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून प्रत्येकजण चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. अखेर प्रतीक्षा संपली 27 सप्टेंबरला अजय देवगणनेही त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ‘दृश्यम 2’ बद्दल एक इशारा दिला होता. आता नुकतेच निर्मात्यांनी अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. त्याच बरोबर चाहत्यांना सांगितले की ‘दृश्यम 2’ चा (Drishyam 2) टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे उत्साह वाढला आहे.

अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दृश्यम 2’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगणचे पात्र विजय साळगावकरचे कुटुंब दाखवण्यात आले नसले तरी हे पोस्टर रहस्याने भरलेले आहे. पोस्टरमध्ये, जिथे अजय देवगण पाठमोरा उभा आहे आणि तो बाबांच्या महासत्संगाच्या दाराकडे पाहत आहे, तर त्याची थोरली इशिता दत्ता रक्ताने (Ishita Dutta) माखलेली काठी हातात धरून आहे. दृष्यम 2 मध्ये अजय देवगणची धाकटी मुलगी बनलेली मृणाल जाधव (Mrunal Jadhav) आता किशोर वयात दाखवण्यात येणार आहे.ती या पोस्टरमध्ये हातात बाबांच्या सत्संगाची सीडी घेऊन दिसत आहे, या पोस्टरमध्ये श्रियाच्या हातात एक बॅग दिसत आहे.

रहस्याने भरलेल्या या पोस्टरसोबतच अजय देवगणने सांगितले की, विजय साळगावकरची केस पुन्हा उघडणार आहे. फर्स्ट लूक शेअर करताना अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालं होत तुम्हाला आठवते ना? विजय साळगावकर आपल्या कुटुंबासह परत आला आहे. या पोस्टरवर अजय देवगणने असेही सांगितले की या सस्पेन्सफुल चित्रपटाचा 2 किंवा 3 तारखेला ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज होण्याचा इशाराही दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट दिवाळीनंतर 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि श्रिया सरन व्यतिरिक्त तब्बू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जी चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दृश्यम’ आणि दृश्यम 2 हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत.