TOD Marathi

कुख्यात डॉन छोटा राजन जीवंत आहे; एम्सच्या स्पष्टीकारणामुळे अफवेला पूर्णविराम

टिओडी मराठी, दिल्ली, दि. 7 मे 2021 – कोरोनामुळे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे निधन झाल्याची बातमी शुक्रवारी सगळीकडे पसरली होती. मात्र, हि अफवा आहे, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा जिवंत आहे, असे स्पष्टीकरण दिल्लीतील एम्सने दिले आहे. त्यामुळे डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे निधनाच्या बातमीचे खंडन झाले आहे.

सध्या छोटा राजनवरला कोरोना झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला दिल्लीत एम्समध्ये रुग्णालयात दाखल केलं आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन राजनला तिहार जेलमध्ये असताना कोरोनाची लागण झाली आहे. एप्रिलच्या अखेरीस त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र, तब्येतीची तक्रार असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल केले होते. यादरम्यान, शुक्रवारी दुपारी त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. पण, अखेर ‘एम्स’ने राजन जिवंत असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधित सुमारे ७० हून अधिक प्रकरणे नोंदविली आहेत. तसेच त्याला पत्रकार ज्योति डे यांच्या हत्येप्रकरणी दोषीदेखील ठरविले. त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे, म्हणून राजन तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

मागील आठवड्यामध्ये मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन व त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले आहे. छोटा राजन हा १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.

महाराष्ट्रा राज्यात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. पण, कारागृहाच्या आतील गँगवॉरच्या भीतीने त्याला कधीही मुंबईच्या जेलमध्ये ठेवलेले नाही.

२०१५ ला त्याला विदेशातून गुन्हेगार हस्तांतरणाच्या मार्फत त्याला भारतात आणले आहे. तेव्हापासून राजनला तिहार जेलमध्ये ठेवले आहे. तिहारमध्ये शिक्षा भोगत असताना त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज