TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे विविध ठिकाणी जोरदार भाषण करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना यानिमित्ताने मार्गदर्शन केलं जात आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांची काल सभा जळगांव जिल्ह्यात होती. त्या सभेत शरद कोळी यांनी भाषण केलं. त्यानंतर त्यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली. सोबतच जिल्हाबंदीही घालण्यात आली. यावर आता शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी कुठलंही जातीयवादी भाषण केलं नाही, तरीही माझ्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेव्हा तयावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. मी कोळी आहे, बहुजन समाजाचा कार्यकर्ता आहे. म्हणून या सरकारला बघवत नाही. आणि म्हणून मला बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे, असं ते म्हणाले.”

कायद्याचे गैरवापर करून अशा गोष्टी केल्या जात आहेत. सरकार त्यांचे आहे म्हणून बेकायदेशीर काम करण्याचे लायसन्स त्यांच्या लोकांना दिले आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टीला भीक घालणार नाही, असं ते म्हणाले.