नवी दिल्ली: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच कॉँग्रेसने एक नवीन नाव समोर आणलं आहे. आता ते मुख्यमंत्री पदाची शप्पथ देखील घेणार आहेत. मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा यांचंच नाव सर्वाधिक चर्चेत होतं. तेच मुख्यमंत्री होतील अशी जोरदार शक्यता होती. परंतु आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचं हरीश रावत यांनी जाहीर केलं आहे.
कॅबिनेट मंत्री आणि तीन वेळा आमदार असलेले चन्नी यांनी आज दिनांक २० सप्टेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चन्नी हे पंजाबमधील पहले दलित नेते आहेत ज्यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. ५८ वर्षीय चन्नी यांनी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पदाची घेतली.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.