TOD Marathi

Cyber Crime Alert : तातडीने Flipkart चा पासवर्ड करा रिसेट; सायबर क्राईम यंत्रणेचे आवाहन

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 मे 2021 – ऑनलाईनरित्या ग्राहक अनेकदा गरजेच्या वस्तूंची खरेदी करतात. मात्र, सध्या कोरोनामुळे ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले जातेय. परंतु, यासह सायबर क्राईमच्या घटनांत वाढ होत आहे. एक छोटीशी चूक आपले बँक अकाऊंट रिकामे होईल. त्यामुळे वेळोवेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम यंत्रणेकडून केले जात आहे.

त्यात आता फ्लिपकार्ट युझर्ससाठी एक महत्वाची सूचना दिली जातेय. त्यांनी आपले पासवर्ड रिसेट करावेत, जेणेकरुन ते सायबर फसवणुकीला बळी पडणार नाहीत.

तुम्ही जर फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन खरेदी करत असाल तर तातडीने तुमचा पासवर्ड रिसेट करावा. देशात होणाऱ्या सायबर फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी ग्राहकांना सल्ला दिलाय, की जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर सातत्याने पासवर्ड रिसेट करणे आवश्यक आहे. सायबर तज्ज्ञांनी फ्लिपकार्ट युझर्सला एका धोक्याबाबत सावध केलं आहे.

तज्ज्ञ राजशेखर राजघरिया यांच्या म्हणण्यानुसार, बिग बास्केटच्या कथित लीक डेटामधून सायबर गुन्हेगार ग्राहकांचे ई-मेल अड्रेस व पासवर्ड विकत आहेत की जे ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या खात्यांशी जुळतात. तसेच त्यांनी सांगितले की, जेव्हा युझर ब्राऊझर बदलतो तेव्हा अमेझॉन लॉगिनसाठी ओटीपी पाठवतो.

राजशेखर राजघरिया यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिलीय. राजशेखर आपल्या ट्वीटमध्ये लिहीतात, काही लोक बिग बास्केट इ-मेलची विक्री करत असावेत, असं वाटतयं. पासवर्ड कॉम्बिनेशन फ्लिपकार्ट डेटा स्वरुपात आहे.

सध्या अनेक लोक सर्व वेबसाईटसाठी एकच पासवर्ड वापरत आहेत. जवळपास सर्व इ-मेल बिग बास्केट डिबी सोबत मिळते जुळते आहेत. त्यामुळे सर्व युझर्सने आपले फ्लिपकार्ट पासवर्ड बदलणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

राजघरिया यांनी सांगितले की, फ्लिपकार्टने आपले अकाऊंटस सुरक्षित केले पाहिजेत. लीक केलेला ई -मेल आणि पासवर्ड असलेला कोणीही फ्लिपकार्टसह कुठूनही व्हीपीएन/टीओआरवरुन सहज लॉगिन करु शकतो. त्यामुळे सर्व अकाऊंटसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन बंधनकारक करायला हवे.

या व्यतिरिक्त त्यांनी टेलिग्रामवरुन पाठवले जाणारे अकाऊंट डिटेल्सही शेअर केलेत. याबाबत संपर्क साधला असता फ्लिपकार्टच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, आमचा समूह ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा व सुरक्षितता राखण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करीत आहेत. आमची माहिती सुरक्षा प्रणाली व नियंत्रण मजबूत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज