टिओडी मराठी, पुणे, दि. 2 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्यात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीमवर भर दिला जात आहे. म्हणून कोरोनाची तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा, प्रशासन यांनी पूर्वतयारी सुरु केली आहे. तर, दुसरीकडे राज्यातील लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात त्यांनी पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत माहिती घेतली. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यातील लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, लसींचा पुरवठा हा कमी अधिक प्रमाणात होत आहे. तसेच लसींचा पुरवठा केवळ महाराष्ट्रासाठीच नसून इतर राज्यांना हि केला जात आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असण्याची शक्यता आहे. लसींचा पुरवठा जर सुरळीत राहिला तर ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच पुणे, पिंपरी चिंचवड येथे कोरोना स्थिती तिसऱ्या टप्प्यात आणि ग्रामीण भाग चौथ्या टप्प्यात आहे. मात्र, आता ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याचे संकेत पवारांनी दिलेत.
तसेच पुण्यातील लसीकरणाची मोहीम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, लसींच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याने काही अडचणी येत आहेत. तरी हि लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.