मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होणार असे एकीकडे बोलले जात असताना उस्मानाबाद येथील एका राजकीय नेत्यांना आमदारांना चक्क सफारी गाडीचे ऑफर दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देऊ अशी घोषणा राष्ट्रीय किसाsafari car, न बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी दिली आहे.
तसेच आपण आमदारांना कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे अरुण निटुरे यांनी 45 सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा काढून घेतलेला आहे. यानुसार प्रति गाडी 26 लाख याप्रमाणे त्यांना 11 कोटी 81 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
आमदार निटूरे म्हणतात की, सर्व आमदारांनी व पक्षांनी मला सहकार्य करावं एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं म्हणून संस्थेसाठी पाठवावा असे झाल्यास मी त्यांचे उपकार विसरणार नाही मी जर संसदेवर गेलो तर आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करता यावं म्हणून सफारी गाडी देऊन मदत करू शकतो. ही कोणत्याही प्रकारची लालच नसून कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांना सहकार्य करू याची हमी देतो