TOD Marathi

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. (Historic Day for Congress Party) दोन दशकांहून अधिक काळानंतर काँग्रेस पक्षात निवडणूक होत आहे आणि या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष पद हे बिगर गांधी घराण्यातील व्यक्तीकडे जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात ही लढत होत आहे. (Congress President Election between Mallikarjun Kharge vs Shashi Tharoor) ही लढत पक्षातच असली तरी काँग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहीत दोन महत्त्वपूर्ण मागण्या केल्या होत्या.

एकतर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडला गेला पाहिजे. या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस पक्षात ही घडामोड होत आहे. निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण हे स्पष्ट होईलच मात्र नव्या अध्यक्षांना पक्षात सर्वाधिकार असतील का? हेही महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. विविध राज्यांमध्ये प्रदेश प्रतिनिधी देखील या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. (PCC Delegates to vote in Congress President Election)

महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी तसेच प्रदेश प्रतिनिधींनी मतदान केलं आहे. आजवर कॉंग्रेस पक्षात केवळ 6 निवडणुका झाल्या आहेत. आज होत असलेली निवडणूक ही 24 वर्षानंतर कॉंग्रेस पक्षात होत असलेली निवडणूक आहे. त्यामुळे या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष पद हे बिगर गांधी घराण्यातील व्यक्तीकडे जाणार आहे.