मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे अपात्र होत अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी केला आहे.
अभिजीत वंजारी म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांना एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री भेटणं हे चुकीचं नाही. पण, कुटुंबाबरोबर भेटल्यानंतर निरोप समारंभ तर नव्हता ना? अशी चर्चा सर्व आमदारांमध्ये होत आहे.”
हेही वाचा “ …राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार”