टिओडी मराठी, बीड, 1 सप्टेंबर 2021 – बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागामध्ये खळबळ उडालीय.
गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची आहे, असे कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करून तिला जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा हजारीवर आरोप केला आहे. डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरचा विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्याच्या विरोधात डॉक्टरसह व्यापारी असोसिएशनकडून हा गुन्हा खोटा आहे, असे सांगत तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केलीय.
हा गुन्हा विरोधात आज असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले आहे. व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केलीय. यामुळे बीड जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालीय.
डॉ. स्वरूपसिंह हजारी हे धारूर नगरपालिकेत विद्यमान नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्ये खाजगी दवाखाना चालवतो. 19 वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली असता तिला सोनोग्राफी करायची आहे, असे कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात करून जातीवाचक बोलले. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यामध्ये पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास सुरू आहे. डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनने हा गुन्हा खोटा आहे, असे सांगितल्याने नेमकं प्रकरण काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.