औरंगाबाद:
औरंगाबाद येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजपसह हनुमान चालीसा आणि अन्य मुद्द्यांवरूनही त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी कोण कोणकोणत्या मुद्यांवर भाष्य केले हे मुद्दे पुढीलप्रमाणे;
- मध्यंतरी एक जनआक्रोश कि जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तो आक्रोश लोकांसाठी नव्हता तर सत्ता गेल्याचा आक्रोश होता.
- आपल्या पंतप्रधानांच्या फोटो कचराकुंडीवर लावणे हे मान्य नाही.
- भाजपच्या प्रवक्त्यांचा गुन्हा तर देशाने माफी का मागावी ?
- भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही.
- भगवी टोपी घातली म्हणून हिंदु होत नाही. भाजपाला चांगलं काम बघवत नाही.
- प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधावे?
- तुमच्या आशीर्वादाने सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली, पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणनारे बघत राहिले.
- 25-30 वर्षाचे आमचे मित्र हार्डवैरी झालेत आणि एवढी वर्ष ज्यांचा विरोध केला त्यांनी मान सन्मान देत सरकारमध्ये मदत केली.
- आम्ही शेतकऱ्यांना बांधिल आहोत, शेतकऱ्यांना भूलथापा देणार नाही.
- भागवत कराडांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महापौर पद दिलं.
- महाविकास आघाडी सरकार राज्यातील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहे.
- पेट्रोल डिझेलचे भाव भरमसाट वाढवायचे आणि थोडे कमी करायचे हे केंद्र सरकारने केलं.
- राज्य विकासाकडे वाटचाल करतोय, अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात सुरू होत आहेत.
- अलीकडेच ऊर्जा आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून मोठे सामंजस्य करार झाले आहेत.
- उज्वला योजनेची काय फरफट झाली ते सर्वांना माहिती आहे.
- संभाजीनगरच्या आणि राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे.
- संभाजीनगरसाठी आपण कितीतरी गोष्टी करतोय, आपल्या सरकारने संभाजीनगरची पाणीपट्टी 50 टक्के कमी केली. मोठ्या प्रमाणात विकासकामे सर्व क्षेत्रात होत आहेत.
- मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेल्या वचनाची पूर्तता करतो आहे.
- सगळे उपाय करून सरकार पडत नाही म्हणून ईडी सारख्या यंत्रणाना कामाला लावलं जातं.
- वाचाळवीर भाजपच्या प्रवक्त्यांमुळे देशाची अब्रू जातेय.
- इंधन दरवाढीनंतर बैलगाडी मोर्चा करणारे भाजपचे लोक कुठे गेले?
अशा विविध मुद्यांवर भाष्य करत राज्य सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध विकास कामांची माहिती मुख्यमंत्र्यांनी या सभेत दिली.